महिला सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 9, 2020

महिला सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल


 महिला सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल


माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणे येथे करगणी ता.आटपाडी, जि.सांगली येथील महिले विरुद्ध सावकराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर हकीकत अशी, यातील फिर्यादी विनायक निवृत्ती सगरे रा. खरसुंडी (Plaintiff Vinayak Nivruti Sagare Ra. Kharsundi) याने सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत वेळोवेळी वरील तारखेस वेळी विनापरवाना बेकायदेशिररीत्या खाजगी सावकारी व्यवसाय करणारी महिला लक्ष्मी दबडे (Lakshmi Dabde, a woman who runs a private lending business) हीच्याकडून त्यांच्या घरगुती व अर्थिक अडचणीमुळे तसेच बेकरीचे दुकान चालविण्यासाठी महीना 20 टक्के या व्याज दराने दोन लाख रूपये घेतले होते.


त्या मुद्दलाचे वेळोवेळी नियमापेक्षा जास्त व्याजदराने पैसे देऊन एकूण 6,95,000/- रूपये व्याजापोटी दिलेले आहेत. तरीही मुद्दलाचे 2 लाख रूपये व व्याजाचे 1 लाख रूपये असे आणखी एकूण 3 लाख रूपयांची मागणी करून महीला आरोपी हिने फिर्यादीस वारंवार फोन करून शिवीगाळी करून मारहाण करण्याची व बघून घेण्याची धमकी देऊन वारंवार त्रास दिला होता.  


याबाबत तक्रारी अर्ज फिर्यादी व साक्षीदार यांनी पोलीस अधिक्षक सो सांगली यांचेकडे देऊन स्थानिक गुन्हे शाखा सागली यांचेकडील पोउनि प्रविण शिंदे यांचे समक्ष नोंदविलेल्या जबाबावरून सदर महिला सावकरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.पो.नि सो यांचे आदेशाने पोउनि कांबळे यांना हे करीत असून  महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधि 2014 चे कलम 4,39,44,45,46 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise