Type Here to Get Search Results !

राजकीय द्वेषापोटी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल : अनिल (शेठ) पाटील


राजकीय द्वेषापोटी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल : अनिल (शेठ) पाटील

माणदेश एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी/आटपाडी :  आटपाडी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासमोर उपस्थित असतानाही जाणीवपूर्वक माझे नाव खोट्या गुन्ह्यात दाखल केले असले तरी गोरगरीबांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतच राहणार असल्याचे प्रतिपादन सिद्धिविनायक उद्योग समुहाचे प्रमुख व युवा नेते अनिल (शेठ) पाटील (Anil (Sheth) Patil, Head and Youth Leader of Siddhivinayak Industries Group) केले.


निंबवडे येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परस्पर विरोधी 29 जणांवर विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनिल (शेठ) पाटील यांचाही समावेश आहे.


अनिल (शेठ) पाटील यांच्यावर खोटा गुन्हा नोंद झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी रविवारी आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याची तयारी (Anil (Sheth) Patil's supporters are preparing to stage a protest at Atpadi police station on Sunday) केल्याचे समजताच आबानगर चौकात सर्व तरुणांना अनिल पाटील यांनी मोर्चा न काढण्याचे तसेच कोरोनाच्या संकट कालावधीत मोर्चा काढून प्रशासनाला त्रास न देण्याची भूमिका अनिल (शेठ )पाटील यांनी व्यक्त करत समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. (Anil (Sheth) Patil appealed to the supporters to remain calm)

यावेळी बोलताना ते म्हणाले, गोरगरिबांना मदत करत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सदैव कार्यरत असून लोकांची कामे करत असताना त्यांना न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. परंतु राजकीय द्वेषापोटी माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेवेळी मी स्वतः पोलीस अधिकाऱ्यासमोर उपस्थित असताना माझे नाव जाणीवपूर्वक गोवण्यात आले. अशा दबावाला मी बळी पडणार नाही. असे अनेक खोटे गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी (Anil (Sheth) Patil will prepare me to fight against injustice) अन्यायाविरोधात कोणाशीही संघर्षाची माझी तयारी आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies