'लय भारी' फेम दिग्दर्शकाचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

'लय भारी' फेम दिग्दर्शकाचे निधन

 'लय भारी' फेम दिग्दर्शकाचे निधन


हैदराबाद : 'लय भारी', 'फुगे' या मराठी हिट चित्रपटांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. याबाबत अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्वीट करत माहिती दिली.


निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सकाळपासून निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर अजून ते जिवंत असून लढत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर निशिकांत कामत यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.


बॉलीवूड मध्ये निशिकांत कामत यांनी दिग्दर्शन केलेला अजय देवगन आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला 'दृष्यम' चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर त्यांची बॉलीवूड मध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून गणना होवू लागली. यानंतर त्यांनी इरफान खानसोबत 'मुंबई मेरी जान' आणि 'मदारी', जॉन अब्राहमसोबत 'फोर्स' आणि रॉकी हँडसम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटांमध्ये 'डोंबिवली फास्ट' व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन 'लय भारी', 'फुगे' या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'सातच्या आत घरात' हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


1 comment:

Advertise