दिघंचीची वाटचाल सामुहिक संसर्ग च्या दिशेने ; नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे बाळासाहेब होनराव यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 29, 2020

दिघंचीची वाटचाल सामुहिक संसर्ग च्या दिशेने ; नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे बाळासाहेब होनराव यांचे आवाहनदिघंचीची वाटचाल सामुहिक संसर्ग च्या दिशेने ; नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे बाळासाहेब होनराव यांचे आवाहन 

माणदेश एक्सप्रेस न्युज


दिघंची : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. शेजारील सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असताना सांगली जिल्ह्यात मात्र त्याचा संसर्ग कमी प्रमाणात होता. याची दखल घेत आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी प्रशासनाचे देखील कौतुक केले होते.


परंतु लॉकडाऊन ३.० नंतर मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले. त्यातील काहीजण तर गावातील आपत्ती समितीला न सांगताच गावी येवून राहिले. कोणतही काळजी न घेता गावामध्ये फिरू लागले. त्यामुळे कोरोनाचा सामुहिक संसर्ग होवू लागला.


या सामुहिक संसर्गाचा मोठा फटका सध्या आटपाडी तालुक्यातील दिघंची गावाला बसला आहे. आटपाडी तालुक्यात सर्वात जास्त कडक लॉकडाऊन हे दिघंची गावामध्ये करण्यात आले होते. तर जनता कर्फ्यूचे पालन ही सगळ्यात जास्त दिवस दिघंची मध्ये होते. एवढे असताना सुद्धा आता दिघंची गावामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येवू लागले लागल्याने कोरोना संसर्गचा फटका गावाला बसला आहे. काल दिनांक २८ रोजी आलेल्या अहवालामध्ये दिघंची मध्ये तब्बल १६ रुग्ण आढळून आले होते तर. आज दिनांक २९ रोजी आलेल्या अहवालामध्ये कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज अखेर एकूण कोरोना बाधितांची संख्या ७२ झाली आहे.


त्यामुळे काम नसताना घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टस्निंगचे पालन करा, नेहमी मास्क वापरा, आपल्या पासून दुसऱ्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या व आजराची लक्षण दिसताच सरकारी दवाखान्यात जावून त्वरित तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करून गावातील बाधीतांची संख्या वाढू नये याची काळजी घेण्याचे आवाहन ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब होनराव यांनी जनतेला केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise