Type Here to Get Search Results !

'सिल्व्हर ओक' वर कोरोनाचा शिरकाव, 2 जण कोरोना पॉझिटिव्ह

 

'सिल्व्हर ओक' वर कोरोनाचा शिरकाव, 2 जण कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक' वर कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाल्याची माहिती समोर आली असून सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे.


दरम्यान, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies