काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे हे आमदार कोरोनाबाधीत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 15, 2020

काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे हे आमदार कोरोनाबाधीत

 

काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे हे आमदार कोरोनाबाधीत


सांगली : काँग्रेसचे नेते आणि सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी, पुत्र शांताराम कदम व नातू यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


आज 15 ऑगस्ट रोजी आमदार मोहनराव कदम यांचेसह कुटुंबातील चौघांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आमदार मोहनराव कदम यांचे वाहन चालक, शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक तसेच या कुटुंबियांच्या संपर्कातील एक तरुण असे एकंदरीत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise