चव्हाण, वासनिक, देवरा यांना लाज वाटली पाहिजे ; या कॅबिनेट मंत्र्यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 24, 2020

चव्हाण, वासनिक, देवरा यांना लाज वाटली पाहिजे ; या कॅबिनेट मंत्र्यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका


चव्हाण, वासनिक, देवरा यांना लाज वाटली पाहिजे ; या कॅबिनेट मंत्र्यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका


मुंबई : सोनिया गांधी यांना काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. त्यात मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश असल्याची राजकीय सूत्रांची माहिती आहे. यावरून दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.


याबाबत त्यांनी ट्वीट केले असून ते म्हणतात की, संपूर्ण पक्ष काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. तरीही गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे.

 त्यांनी तातडीने या बद्दल सोनिया गांधींची माफी मागितली पाहिजे. तसेच जर या नेत्यांनी सोनिया गांधींची माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात काँग्रेस कार्यकर्ते कुठेही फिरकू देणार नाहीत, अशा इशारा केदार यांनी दिला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise