म्हसवड मध्ये घरगुती पद्धतीने मोहरम सण साजरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 30, 2020

म्हसवड मध्ये घरगुती पद्धतीने मोहरम सण साजराम्हसवड मध्ये घरगुती पद्धतीने मोहरम सण साजरा

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोना साथीच्या आजारामुळे जर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा मोहरम हा सण म्हसवड मधील मुस्लिम बांधवानी अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे यांच्याबरोबर फारुक काझी यांनी मोहरम सण साजरा करणेबाबत चर्चा केली.


त्यावेळी झालेल्या चर्चेत सपोनि वाघमोडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार  मोहरम हा सण  मोठ्या प्रमाणात सार्वजनिक साजरा न करता साधेपणाने आपआपले घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन शहर काझी फारुक काझी यांनी केले होते.  


कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणीही मशिदीमध्ये न येता आपआपल्या घरीच फातीहा द्याव्यात. मशिदीमध्ये फक्त पंजे बसवून सालकरी सह इतर दोनच व्यक्ती  पाच दिवस पारंपारीक विधीवत कार्यक्रम करतील असे प्रत्येकांचे घरी सांगून त्यांना घरगुती पद्धतीने मोहरम सन साजरा करण्याचे आवाहन केले होते.  


त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करुन कोणतीही मिरवणूक न काढता  मुस्लिम बांधवानी मोहरम सण घरात राहूनच साजरा केला. या पाच दिवसाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतेत मोहरम साजरा झाला. सपोनि गणेश वाघमोडे यांनी चोख बंदोबंस्त ठेवला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise