भावाने केला भावाचा खून I दिघंची येथील घटना I आरोपीस अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 12, 2020

भावाने केला भावाचा खून I दिघंची येथील घटना I आरोपीस अटक

दिघंची खून

 भावाने केला भावाचा खून I दिघंची येथील घटना I आरोपीस अटक 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : भावानेच सख्या भावाचा खून केल्याची घटना दिघंची ता. आटपाडी, जि.सांगली येथे घडली असून याबाबत आरोपी भावास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (Mayat Santosh Ramchandra Yadav aged 32 years, resident of Dakmala, Dighanchi) मयत संतोष रामचंद्र यादव वय ३२ वर्षे रा डाकमळा, दिघंची याचा दि. १२/०८/२०२० रोजीचे सकाळी ०९.३० वा चे पुर्वी दिघंची एमएसईबी बोर्डाचे पाठीमागे अरुण जाधव यांचे शेतजमिनीजवळील विजबोर्डाचे पाठीमागे रोडवर डोक्यावर कशाने तरी गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. 


अशी माहिती मिळाल्याने (Atpadi Police Thane Police Inspector B A Kamble) आटपाडी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक बी.ए.कांबळे, सपोनि पाटील, सपोनि गभाले, सपोफौ भोते, भांगरे, चोरमले, पोहवा नंदकुमार पवार, पोना/ रामचंद्र खाडे, दिग्वीजय कराळे, पोकॉ | वसमाळे, नितीन मारे, विशाल चव्हाण, सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचे परिस्थितीवरुन, सभोवतालचे निरीक्षण करुन सदर गुन्हयाचा अवध्या दोन तासात कसोसीने तपास करुन (Accused Ganesh Ramchandra Yadav of Dakmala, Dighanchi) आरोपी गणेश रामचंद्र यादव रा डाकमळा, दिघंची ता आटपाडी यास पकडण्यात आले. 


आरोपी याने त्याचा सख्खा भाऊ संतोष रामचंद्र यादव वय ३२ वर्षे रा डाकमळा, दिघंची हा सतत दारु पिऊन तो दारुच्या आहारी गेला होता. तो दररोज दारुचे नशेत घरातील आई-वडील व घरातील लोकांना वारंवार त्रास देत असलेने त्या त्रासाला कंटाळुन आरोपी याने दि. ११/०८/२०२० रोजीचे रात्रीचे वेळी दिघंची एमएसईबी बोर्डाचे पाठीमागे अरुण जाधव यांचे शेतजमिनीजवळील विजबोर्डाचे पाठीमागे रोडवर डोक्यावर दगडाने गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. त्या बाबत आटपाडी पोलीस ठाणे (Atpadi Police Thane) गुरनं २४३/२०२० भा.द.वि.सं. ३०२. प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर आरोपीस सदर गुन्हयात अटक करणेत आली आहे.


सदर गुन्हयाचा तपास (Superintendent of Police Suhel Sharma) पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अपर पो.अधि डुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांचे मार्गदर्शनाखाली (Atpadi Police Thane Police Inspector B A Kamble) पोलीस निरीक्षक बी.ए. कांबळे हे करीत आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise