ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी सत्याग्रह आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी सत्याग्रह आंदोलन


ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी सत्याग्रह आंदोलन 


मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व काही आलबेल सुरू असताना, हरिनामावर मात्र बंदी आहे. मंदिरे बंद करण्यात आली असून, भजन करणाऱ्या वारकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. 


राज्यातील सध्याचे सरकार हिरण्यकश्यपू सरकार असून, या सरकारला धडा शिकवण्यासाठी विश्व वारकरी सेनेने चलो पंढरपूरचा नारा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टला श्री विठ्ठलाच्या मंदिरा समोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात येत आहे. या आंदोलनात विश्व वारकरी सेनेचे एक लाख वारकरी उपस्थित राहणार आहे.


सामान्य माणसाच्या धार्मिक हक्कासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करून, धर्म मार्तंडांना धडकी भरविणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होत असून त्याचे नेतृत्व खुद्द घटनाकारांचे नातू करणार आहेत. 


सरकारने लॉकडाऊनचा फारसा बाऊ न करता धार्मिक स्थळे उघडी करून लोकांना भीतीतून बाहेर येण्यास मदत करावी अशी त्यांची मागणी असून त्याचाच एक भाग म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise