अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उथळला ; उत्तराखंडमधून शार्पशूटर ला अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उथळला ; उत्तराखंडमधून शार्पशूटर ला अटक


अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उथळला ; उत्तराखंडमधून शार्पशूटर ला अटक


मुंबई : अभिनेता सलमान खानची हत्या करण्यासाठी मुंबईत येऊन रेकी करणाऱ्या गुन्हेगाराला क्राइम ब्रांचने अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव राहुल असे आहे.  


राहुल उर्फ सांगा यास क्राइम ब्रांचने १५ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये येथून अटक केली. दरम्यान जानेवारी महिन्यात आरोपीने सलमानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.


राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांचे आरोप आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise