आटपाडी शहरातील दोन नामांकित डॉक्टरसह तालुक्यात एकूण ८ जण कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 3, 2020

आटपाडी शहरातील दोन नामांकित डॉक्टरसह तालुक्यात एकूण ८ जण कोरोना पॉझिटिव्ह


आटपाडी शहरातील दोन नामांकित डॉक्टरसह तालुक्यात एकूण ८ जण कोरोना पॉझिटिव्ह


माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : काल आटपाडी शहरासह तालुक्यात एकूण ८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या रूग्णामध्ये शहरातील दोन नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे.काल आलेल्या रूग्णामध्ये आटपाडी शहर ५ नवे रुग्ण, शेटफळे २ तर आवळाई येथील एका रूग्णाचा समावेश आहे. आटपाडी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर व त्याच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. सदर डॉक्टरचा दवाखाना स्त्री रोग तज्ञ म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. तर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील युवा डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वाणी गल्ली येथील पहिल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शेटफळे येथील २ तर आवळाई येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४८ झाली आहे.शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी लग्न, वाढदिवस व शक्यतो गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे तसेच काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment

Advertise