आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 14, 2020

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण

 

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाने आज कहरच केला असून आज तब्बल २१ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.


या नवीन २१ रूग्णामध्ये दिघंची येथील तब्बल १६ रुग्णांचा समावेश आहे. तर आटपाडी शहर २ रुग्ण, बनपुरी १ रुग्ण व झरे येथील २ रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह मध्ये समावेश आहे.


दिघंची येथील काल पॉझिटिव्ह आलेल्या ४ रुग्णाच्या संपर्कातील रुग्ण जास्त आहेत. तर आटपाडी येथील काल पॉझिटिव्ह आलेल्या तिघांच्या संपर्कातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. 


बनपुरी येथील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून झरे येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले असुन आज एकूण २१ नवे पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.    


No comments:

Post a Comment

Advertise