Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ नवे रुग्ण

 आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण चालूच असून आज आलेल्या अहवालामध्ये तालुक्यात कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत .


यामध्ये आटपाडी शहरात ६, गळवेवाडी ४ यपावाडी २ व दिघंची येथील एका रुग्ण असे १३ नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. यामध्ये यपावाडी येथील जेष्ठ नेत्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. गळवेवाडी येथील राजकीय कुटुंबांतील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिघंची येथील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


आटपाडी शहरात एका डॉक्टरसह ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आटपाडी सागरमळा नं. २ येथील पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर साई मंदिर परिसरातील एका डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


व्यापारी पेठेतील अजून एका कापड व्यापाऱ्याचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर बसस्थानक परिसरातील मेन पेठेतील एका महिलेचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आज शहरात एकूण ६ जण कोरोनाबाधित आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies