कानकात्रेवाडी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 7, 2020

कानकात्रेवाडी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कानकात्रेवाडी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन कानकात्रेवाडी येथील (100 मी.) - 1) कानकात्रेवाडी गावाचे उत्तर - लक्ष्मण रंगनाथ म्हारनूर यांची शेतजमीन 2) कानकात्रेवाडी गावाचे दक्षिण - हणमंत बाबा हाके यांची शेतजमीन 3) कानकात्रेवाडी गावाचे पूर्व - दादासो यशवंत अर्जुन यांची शेतजमीन 4) कानकात्रेवाडी गावाचे पश्चिम - शामराव सिध्दु देवकते यांची शेतजमीन. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट  झोन म्हणून अधिसूचित केले आहे. या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise