अनिता पाटील यांची राष्ट्रवादीची महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

अनिता पाटील यांची राष्ट्रवादीची महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड


अनिता पाटील यांची राष्ट्रवादीची महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा पदी अनिता पाटील यांची निवड झाली असून पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार केला. सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  अध्यक्षा छाया पाटील  यांच्याकडून निवड करण्यात आली आहे.

आटपाडी तालुक्यात उन्नती महिला विकास फौंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळूण देण्याचे काम अनिता पाटील यांनी केले. दारू बंदी, विधवाबद्दल आपुलकी अशा सामाजिक कार्यात त्यांनी ठसा उठवण्याचे काम केले आहे. लॉकडाऊन काळात बाहेरून गावावरून मोलमजूरी करण्यासाठी तालुक्यात आलेल्या व्यक्तीना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पाठपुराव करून त्यांच्या मायभूमीत पोहचिण्यात त्यांनी जबाबदारी निभावली आहे. तालुका पातळीची जबबादारी प्रामाणिक पणे पार पाडत आता जिल्हाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली  आहे.
महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी पडता कामाने यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गेली दोन वर्षे ते दारूबंदी होण्यासाठी उपयोजना करत असून महिलावर  होणारा अन्याय बद्दल ते आवाज उठवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना जिल्हयाची जबाबदारी देऊन महिलाचे संघटन करण्यासाठी व महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, बाबासाहेब मुळीक, अश्विनी कासार, रेखा पाटील, मजुश्री पाटील, वंदना जाधव, अश्विनी भोसले, सुनिता जाधव, वनिता फुले उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment

Advertise