निंबवडे, विठ्ठलापूर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 7, 2020

निंबवडे, विठ्ठलापूर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द


निंबवडे, विठ्ठलापूर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द

माणदेश एक्सप्रेस न्युज 

सांगली : आटपाडी तालुक्यातील निंबवडे व विठ्ठलापूर हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 9 जून रोजी निदर्शनास आला होता, तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 7 जुलै रोजी पूर्ण  झाले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी दि. 11 जून रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 8 जुलै 2020 पासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.  

तर विठलापूर हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 10 जून रोजी निदर्शनास आला होता, तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 8 जुलै रोजी पूर्ण  होत आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी दि. 12 जून रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 9 जुलै 2020 पासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.  

No comments:

Post a Comment

Advertise