सातारा जिल्हा भूकंपाने हादरला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

सातारा जिल्हा भूकंपाने हादरला


सातारा जिल्हा भूकंपाने हादरला
सातारा :  सातारा जिल्ह्यातील  कोयना परिसर भूकंपाच्या धक्याने हादरला असून  2.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचा केंद्र बिंदू वारणा खोऱ्यातील चांदोली गावच्या पश्चिमेला 6 किमी अंतरावर असल्याचं समजत आहे.

कोयना धरणाच्या परिसरात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असता. मागील महिन्यात 24 जून रोजी वारणा खोऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाचे 2.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची नोंद झाली.
वारणा खोऱ्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला यापासून कोणताही धक्का नसल्याचंही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise