राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीच्या खानापूर तालुका निवडी जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 7, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीच्या खानापूर तालुका निवडी जाहीर


राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीच्या खानापूर तालुका निवडी जाहीर
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : विटा शहर व परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकार्यांीची निवड पालकमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिवराव (भाऊ)  पाटील,  कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक,  विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, युवानेते वैभव पाटील, तालुका अध्यक्ष किसन जानकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आल्या.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी जिल्हा कार्यकारिणी सदस्य माधव रोकडे, आयटी सेल जिल्हा कार्यकारिणी सदस्य  राजेंद्र शितोळे, खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी  उपाध्यक्ष विनायक कचरे, विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुनील गायकवाड,  विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण भिंगारदेवे  यांना निवडीच्या पदाचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व ओळख जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी करून दिली. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य किरण तारळेकर, गजानन निकम, आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख,  खानापूर तालुका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हरी माने,  विटा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विशाल पाटील,  राष्ट्रवादी ओबीसी सेल विटा शहराध्यक्ष एजाज मुल्ला,  विटा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ शितोळे, विटा शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित पाटील,  युवा नेते राजू जानकर संदीप मुळीक तसेच मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise