‘राजगृह’ वरील हल्ल्याचा म्हसवड मध्ये निषेध - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

‘राजगृह’ वरील हल्ल्याचा म्हसवड मध्ये निषेध


‘राजगृह’ वरील हल्ल्याचा म्हसवड मध्ये निषेध 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : मंगळवारी भरदुपारी मुंबई दादर येथील महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या  राजगृहावर अज्ञात जातीवादी हल्लेखोराने नासधुस केली त्या घटनेचा प्रथम निषेध म्हसवड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मोजक्याच बैठकीत करण्यात आला. या घटने मागे असलेल्या जातीवादी हल्लेखोराचा निषेध करून त्याचेवर कड़क कारवाई करुन या मागील खरा जातीवादी चेहर्याचा तपास राज्याचे गृहमंत्री व पोलिस प्रशासनाने तातकाळ करावा अन्यथा डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व तमाम बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या  घटनेस पोलिस प्रशासन व गृहमंत्री जबाबदार राहतील असे मत माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी व्यक्त केले 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, लक्ष्मण सरतापे, शिवदास सरतापे, बाळू सरतापे, खंडेराव सावंत, गणपत फुटाणकर, योगेश सरतापे, विकास सरतापे, हिंदूराव सरतापे, विठ्ठल सरतापे, राहुल सरतापे, दादा सरतापे, रणजित सरतापे, किरण सरतापे, अरुण सरतापे आदी मोजक्या कार्यकर्त्याच्या उपस्थित सोशल डिस्टन्स ठेवून समाज मंदिरात बैठक घेण्यात आली. तर म्हसवड पोलिस स्टेशनला सपोनि गणेश वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले या दिलेल्या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगराध्यक्ष  नितिन दोशी, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, शिवदास सरतापे, लक्ष्मण सरतापे, बाळू सरतापे, सामाजिक कार्यकर्ता राजकुमार डोंबे, शंकर पानसांडे, खंडेराव सावंत, सिध्देश्वर डांगे सह्या आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise