Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील ८ तर पिंपरी बु येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आज आटपाडी तालुक्यातील एकूण ९ जण कोरोनाग्रस्त


आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील ८ तर पिंपरी बु येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह
आज आटपाडी तालुक्यातील एकूण ९ जण कोरोनाग्रस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुषाला प्रथम कोरोनाची लागण झाली होती. सदर पुरुष हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून दिनांक २४ जून रोजी आला होता. त्याला कानकात्रेवाडी येथे होम क्वारंनटाइन करण्यात आले होते.

परंतु त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या नागरिकांची मोठी यादी असल्याने आटपाडी तालुक्यातील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 
त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या नागरिकांची स्वब तपासणीला पाठवले असता आज येथील एकूण ८ जणांना कोरोनाचिल लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४ पुरुष व ४ महिला यांचा समावेश आहे.
तर पिंपरी बु. येथे पुणे येथून आलेल्या तरुणाला त्रास होवू लागल्याने त्याची तपासणी केली असता त्याला ही कोरोनाची लागण झाली असून सदर व्यक्ती हा होम क्वारंनटाइन असल्याने त्याच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी सुरु असून त्यांना क्वारंनटाइन करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies