Type Here to Get Search Results !

दुध दरवाढ करण्याची सदबुद्धी विठुरायाने राज्य सरकारला द्यावी : प्रा. सचिन होनमाने


दुध दरवाढ करण्याची सदबुद्धी विठुरायाने राज्य सरकारला  द्यावी : प्रा. सचिन होनमाने
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली  दहिवडी तहसिलदार यांना निवेदन देऊन  कार्यालयाच्या पुढे  विठुरायाच्या  प्रतिमेला दुग्ध अभिषेक रासपच्या वतीने घालण्यातत आला व व विठुरायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना  दुधाला ३५ रू भाव व  १० रू प्रतिलिटर  अनुदान देण्याची सदबुद्धी द्यावी अशी  पांडुरंग चरणी प्रार्थना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली. दूध दरवाढीसाठीच्या घोषणांनी तहसिल परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना प्रा. सचिन होनमाने म्हणाले की, महाराष्ट्रात लाखों तरुण दूध व्यवसाय करीत आहेत. आज पशुखाद्य, औषधपचार व चारा यांचा खर्च  पाहता एका गाईला एक दिवसासाठी २५ किलो चाऱ्यासाठी ६० ते ७० रु. खर्च येतो. पशुखाद्य कमीत कमी ५ किलो व भूसा १० किलो यासाठी २oo ते २५० रु औषधोपचार व टॉनिक यासाठी ५० रू खर्च  असा एकत्रित खर्च ४०० ते ४५० रु खर्च येतो आणि सर्व साधारण एका गाई २o ते २५ लिटर दूध  देते. आणि दर मिळतो १८ ते २o रु. त्यामुळे  दूधाचे ३५० ते ४०० रू,  होतात. दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्याचे कष्ट वेगळेच असते. महादेव जानकर मंत्री असताना दूधाला प्रतिलिटर ५ रू अनुदान मिळत होते. परंतु आजच्या घडीला दुधाचे दर प्रचंड घसरल्यामुळे शासनाने दूधाला किमान प्रतिलिटर १o रू थेट शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा करण्याची सदबूद्धी शासनाला द्यावी यासाठी विठुराया कडे साकड घालण्यात आले.

यावेळी ॲड.विलास चव्हाण, सुनिल वाघमोडे, दादा माळवदे, दत्ता खांडेकर, दादासाहेब विरकर, शिवाजी गलंडे, इंजि. संदीप होनमाने, तुषार खाडे, आनंद दोलताडे, भारत राखुंडे, संजय  महानवर, सचिन वाघमोडे, हणमंत काळे  इ.  पदाधिकारी व बहुसंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies