Type Here to Get Search Results !

कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा अजनाळे येथे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी


कृषी दिनानिमित्त  कृषी संजीवनी सप्ताह साजरा
अजनाळे येथे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी दि १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. कृषी संजीवनी सप्ताह याच्या निमित्ताने रविवार दिनांक ५ जुलै रोजी  अजनाळे, चिनके, वझरे, येथे कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध पिकांची पाहणी करून कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. 

याप्रसंगी कृषी सहाय्यक दीपक ऐवळे म्हणाले, शेतकऱ्यांनी  कृषी विभागाकडून  दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे . यामध्ये मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, उन्नत शेती समृद्ध शेतकरी,एनएचएम  अंतर्गत फळपीक विमा योजना, अंतर्गत गट स्थापन  करणे  इत्यादी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. यावेळी कृषी सहाय्यक यु.ई. चंदनशिवे, कृषी सहाय्यक संतोष खांडेकर, कृषी सहाय्यक श्री. सोनवणे, कृषी सहाय्यक श्री. कोळी, सरपंच विनायक मिसाळ, पांडुरंग मिसाळ, सरपंच राजू पाटील, पोलीस पाटील सचिन पाटील, माजी सरपंच प्रशांत रेड्डी, तमन्ना पाटील, उपसरपंच बाळासो मिसाळ, मोहन मिसाळ, आनंदा मिसाळ,  श्री. माने भाऊसाहेब, अशोक मिसाळ, धर्मराज कोळवले, नंदू पाटील, समाधान धांडोरे, रमेश येलपले, हणमंत देशमुख, बाळासो राऊत, बाळासाहेब पालसांडे, भीमराव जाधव, कृषी मित्र तानाजी मिसाळ यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies