तपासणी सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

तपासणी सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले


तपासणी सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले 
सोलापूर : बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोडवरील क्वारन्टइन सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह ४ रुग्ण पळून गेल्याने प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोव्हिड सेंटरमधील रुग्णांची तपासणी सुरू असताना क्वारन्टाइन केलेले चार जण पळून गेले आहेतयाबाबत या चौघांविरुध्द कोविड 19 चा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्याने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध भुजबळ यांनी याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे चौघांविरुध्द रोगप्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्येने 3 हजाराचा टप्पा ओलंडला आहे. सोलापूर शहरातील कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी राज्यशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात असले तरी कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसत नाही.

No comments:

Post a Comment

Advertise