कंटेनमेंट झोनचा कालावधीही कमी होणार : मंत्री विजय वडेट्टीवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 3, 2020

कंटेनमेंट झोनचा कालावधीही कमी होणार : मंत्री विजय वडेट्टीवार


कंटेनमेंट झोनचा कालावधीही कमी होणार : मंत्री विजय वडेट्टीवार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपुर्व करावयाचे नियोजन संदर्भात आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी त्यांनी कंटेनमेंट झोनचा कालावधीही कमी होणार असल्याचे सांगितले आहे. 

यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाने चांगली कामगिरी बजावल्याबद्दल कौतुक केले. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त आहे याबाबतची कारणमिमांसा जाणून घेतली. सद्यस्थितीत कंटेनमेंट झोनचा कालावधी 28 दिवस असून सदर कालावधी कमी करण्याबाबत सरकार विचारविनिमय करत असल्याचे यावेळी सांगितले. 
ग्रामीण भागात लोकांची घरे जवळ-जवळ असतात तसेच कंटेनमेंट झोनचाच्या नियमानुसार संपूर्ण गावच झोन मध्ये येत असल्याने सदर निर्णयाचे गावाला फायदे होणार आहेत. 


No comments:

Post a Comment

Advertise