पी चिदंबरम यांची नरेंद्र मोदींवर टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

पी चिदंबरम यांची नरेंद्र मोदींवर टीका

पी चिदंबरम यांची नरेंद्र मोदींवर टीका 
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींची गलवान खोऱ्यातील रुग्णालय भेट सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या फोटोचे कोलाज टि्वट केले आहे. ’ही चित्रे लाखो शब्दाच्या बरोबर आहेत’, असे कँप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांनी भेट दिलेल्या रुग्णालयातील फोटोंची चिंदबरम यांनी तुलना केली आहे. मनमोहन सिंग यांनी भेट घेतलेल्या रुग्णालयात सैनिक जखमी दिसत असून बेडशेजारी ओषधं, ड्रिपची व्यवस्था पाहायला मिळत आहेत. तर मोदींनी भेट घेतलेल्या रुग्णालयात बेड दिसत आहेत, परंतु तिथे ड्रिपची व्यवस्था नाही. तसेच बेडशेजारी ओषधं नाही. तर डॉक्टारांच्या जागी फोटोग्राफर आहे. बेडच्या बाजूला साधी पाण्याची बॉटलही नाही. दोघांच्या फोटोचे कोलाज करून करून चिदंबरम यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान अगदी आयत्या क्षणी असलेल्या जागेतच हॉस्पिटल उभारण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. मोदींनी फक्त फोटोंसाठी हा सगळा बनावटीपणा केल्याचे नेटकरी म्हणाले. तर दुसरीकडे सरकार आणि लष्कराने हे आरोप फेटाळले आहेत. देशातील शूर सैन्यावर कशा प्रकारे उपचार केले जातात यावर शंका घेणे आणि टिका करणे दुर्दैवी आहे असल्याचे म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise