नवोदय परीक्षेत आटपाडी तालुक्याची कामगिरी चांगली अनिस नायकवडी : नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 7, 2020

नवोदय परीक्षेत आटपाडी तालुक्याची कामगिरी चांगली अनिस नायकवडी : नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार


नवोदय परीक्षेत आटपाडी तालुक्याची कामगिरी चांगली 
अनिस नायकवडी : नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समिती सभागृहामध्ये तालुक्यातून सन २०२०/२१ साठी नवोदय विद्यालय पलूस याठिकाणी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. नवोदय साठी निवड झालेल्या जिल्हा परिषदेच्या गळवेवाडी शाळेचा रामकृष्ण गोडसे, शेटफळे शाळा नं.१ चा पवन गायकवाड, निंबवडे शाळा नं. १ चा संस्कार मोटे, तडवळे शाळेची अनुष्का महामुनी, दिघंची गर्ल्स हायस्कूलची चतुर्थी जावीर या विद्यार्थ्यांचा सत्कार आटपाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने व आटपाडी पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. 

याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ.भूमिका बेरगळ, उपसभापती रुपेश पाटील, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी  पंकज शेळके, गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, मुक्तेश्वर माडगूळकर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे, केंद्रप्रमुख अर्जुन विभुते, मैनाताई गायकवाड व वरील सर्व शाळांचे शिक्षक, पालक पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नवोदय च्या निकालांमध्ये  सांगली जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर राहून आटपाडी तालुक्याने अत्यंत चांगल्या पद्धतीचे सुयश मिळवले असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी म्हणाले. यापुढेही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या पद्धतीचे योगदान आटपाडी तालुक्याचे राहील या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise