महिला वकील आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 3, 2020

महिला वकील आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

माणदेश एक्सप्रेस न्युज
अॅड. स्मिता पवार
महिला वकील आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील संभाजीनगर येथील उजनी वसाहतीमध्ये राहणारे विठ्ठल गोवे यांची कन्या सोलापूर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करीत होत्या. अॅड. स्मिता यांचा विवाह सोलापुरातील मुरारजी पेठ येथील जुनी पोलिस लाईन येथे राहणारा धनंजय पवार याच्याबरोबर झाला होता.
लग्नानंतर थोडे दिवस चांगले गेल्यानंतर अॅड.स्मिता यांना सासरकडील लोकांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. स्मिता स्वतः वकील असतानाही सासरचा त्रास सहन करत होत्या. पण या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर ३० जून २०२० रोजी सासरी जुनी पोलिसलाईन येथे राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद मृत स्मिता पवार यांची आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय ५०, रा. उजनी वसाहत पाठीमागे, संभाजीनगर, ता. मंगळवेढा) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली.

या फिर्यादीवरून मृत स्मिता पवार हिचा पती धनंजय शिवाजी पवार, सासू शैलजा शिवाजी पवार,  नणंद सविता शिवाजी पवार, दीपाली शिवाजी पवार (सर्व रा.जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ) अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास सहा.पो.नि.वाबळे हे करत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise