किसान क्रेडीट कार्डवर पशुधन मिळणार - विशाल काका पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 23, 2020

किसान क्रेडीट कार्डवर पशुधन मिळणार - विशाल काका पाटील


किसान क्रेडीट कार्डवर पशुधन मिळणार  - विशाल काका पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने 'आत्मनिर्भर भारत' ही योजना सुरु केली आहे. याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ एक पाऊल पुढे आलेला आहे. दिघंची येथे या योजने ची सुरुवात संस्थेचे चेअरमन विशाल काका पाटील व जनरल मॅनेजर डकरे साहेब यांच्या शुभ  हस्ते करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एका दिवसात तब्बल एकशे अठरा फॉर्म शेतकऱ्यांनी भरून दिले यावेळी बोलताना विशाल काका पाटील म्हणाले, दूध संघाच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपल्या संस्थेचे जोडलेले आहेत या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पुरवणे हे क्रमप्राप्त आहे म्हणून केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड या  योजना अंतर्गत संस्थेच्या प्रत्येक संकलन केंद्रावर या अर्जाचे वाटप होणार आहे. ही योजना लोकनेते मा. हणमंतराव पाटील दूध संघाच्या वतीने ज्या शेतकऱ्यांचे दूध हे कोणत्याही मदतीशिवाय थेट संघ खरेदी करतो अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.किसान क्रेडिट कार्ड वर पीक कर्जाशिवाय 1 लाख 60 हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज दुधाळ पशुधन खरेदीसाठी आहे. या योजनेसाठी  शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा यासह वैयक्तिक माहिती,  कुटुंबाची माहिती व  पशुधनाची यादी असा एक पानी अर्ज आमच्या दूध संकलन केंद्र उपलब्ध आहे. तो भरून जमा करावा हे अर्ज संघामार्फत बँकांना सादर केले जातील व बँका  आपल्याला पतपुरवठा करतील. या योजनेमुळे केसीसी धारक  शेतकऱ्याला 50 व 75 टक्केप अनुदानाच्या  योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल कार्डद्वारे मिळणार असून शंभर टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय करता येणे आता सोपे होणार आहे. आत्मनिर्भर किसान या योजनेअंतर्गत सुरुवातीला किसान क्रेडिट कार्डद्वारे पतपुरवठा होईल तसेच ज्यांचे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना त्यात कार्डवर जादाचा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती चेअरमन विशाल काका पाटील यांनी बोलताना दिली.यावेळी संकलन केंद्रप्रमुख प्रशांत गवळी, अमोल काटे,  पोपटराव वाघमारे,  कांतीलाल कराडे, संघ व्यवस्थापक ऐवळे साहेब तसेच दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:

Post a Comment

Advertise