कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक


कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक
कानपूर : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.
विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा
पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.
दरम्यान, विकास दुबेच्या अटकेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक टिवट केलं असून ज्यांना वाटतं की महाकालला शरण आल्यावर त्यांची पापं धुतली जातील, त्यांनी महाकालला खऱ्या अर्थानं ओळखलंच नाहीय. आमचं सरकार कुठल्याही दोषींना सोडणार नाही, असे म्हणाले.  विकास दुबेला अखेर मध्य प्रदेशात पकडलं. मात्र तीन जुलैपासून तो फरार होता. त्याची माहिती देणाऱ्याला पहिल्यांदा पोलिसांनी 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नंतर ही रक्कम 2.5 लाख केली होती तर बुधवारी त्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचा इनाम देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment

Advertise