एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉटसअॅप वापरणं शक्य - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉटसअॅप वापरणं शक्य


एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉटसअॅप वापरणं शक्य
नवी दिल्ली : इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअॅप आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आता व्हॉटसअॅप आपल्या युजर्ससाठी असचं एक नवं फिचर लवकरच लॉन्च करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी एका मल्टी डिवाइस सपॉर्ट फीचरवर काम करत होती. हे फिचर लवकरच युजर्सला वापरता येणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स एकाच नंबरचा वापर करून फोनमध्ये व्हॉटसअॅप सुरु ठेवू शकणार आहेत.
 मीडिया रिपोटर्सनुसार, व्हॉटसअॅपमध्ये लिंक्ड डिवाइसेज नावाचं वेगळं सेक्शन देण्यात येणार आहे. ज्यामार्फत कोणत्या डिवाइसमध्ये एकाच नंबर वरून अकाउंट सुरु आहे, याची माहिती मिळणार आहे. हे सेक्शन युजर्सना व्हॉटसअॅप मेन्यूमध्ये देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise