मास्क घाला नाहीतर १० हजार खिशात ठेवा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

मास्क घाला नाहीतर १० हजार खिशात ठेवा


मास्क घाला नाहीतर १० हजार खिशात ठेवा 
तिरूवनंतपुरम :  मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी केला नाही तर तब्बल 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे केरळ सरकारने जाहीर केले असल्यान मास्क घाला नाहीतर १० हजार रुपये खिशांत ठेवा असा इशाराच सरकारने नागरिकांना दिला असून केरळ सरकारने हा निर्णय पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत लागू केला आहे. त्याचबरोबर सरकारने सोशल डिस्टन्सिंग पाळणे देखील अनिवार्य केले आहे.
प्रत्येक ठिकाणी 6 फूटांचे सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागणार असल्याचे केरळ सरकारने सांगितले आहे. व्यावसायिक आस्थापनांमध्ये तसेच दुकानांमध्ये एकावेळी 20 पेक्षा अधिक ग्राहक जमा होऊ देऊ नये. त्याबरोबर सर्व ग्राहकांना 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते किंवा फुटपाथवर थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरकारने लग्न आणि अंत्ययात्रेसंदर्भात देखील नियम घालून दिलेले आहे. लग्न समारंभात 50 लोक सहभागी होऊ शकतात. तर अंतयात्रेत फक्त 20 लोक सहभागी होऊ शकतात.

No comments:

Post a Comment

Advertise