यावर्षी लालबागच्या राजाचा गणपती नाही; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

यावर्षी लालबागच्या राजाचा गणपती नाही; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

माणदेश एक्सप्रेस न्युज

यावर्षी  लालबागच्या राजाचा गणपती नाही; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई : लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोना संकट असल्यानं मंडळायाने यावर्षी गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळ आरोग्यसेवा करणार आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. एवढचं नाहीतर देशविदेशातून लोकं दर्शनासाठी येत असतात. पण यावर्षी हा उत्सव होणार नाही. गणेशोत्सवात लालबागमध्ये लाखो भाविक येत असतात गर्दीत कोरोनाची लागण असलेल्यांचा वावर आला तर कित्येकांना यांची लागण होऊ शकते आणि परिणामी शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू शकतो त्यामुळेच सणासुदीला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise