अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत ; या विरोधकांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत ; या विरोधकांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर


अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा
मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत ; या विरोधकांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तरमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत. ते अनेक दिवस मंत्रालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही, या विरोधकांच्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


 अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा असा टोला त्यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांत मी मंत्रालयात कमीतकमी गेलो या आरोपात काही दम नाही. सध्या तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. या तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा करुन घेता येत नसेल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच आहात. मी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घरबसल्या सगळीकडे जाऊ शकतो. त्यामुळे एकाचवेळी संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवता येते. मुख्य म्हणजे निर्णय ताबडतोब घेता येतात. मी फिरत नाही. घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा, असे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise