प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट )आटपाडी यांचे वतीने शिक्षण विभागाकडे नव्याने रुजू झालेल्या राजू मुजावर यांचा स्वागत सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 3, 2020

प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट )आटपाडी यांचे वतीने शिक्षण विभागाकडे नव्याने रुजू झालेल्या राजू मुजावर यांचा स्वागत सत्कार


प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट )आटपाडी यांचे वतीने शिक्षण विभागाकडे नव्याने रुजू झालेल्या राजू मुजावर यांचा स्वागत सत्कार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका शिक्षक संघ थोरात गट यांचे वतीने पंचायत समिती आटपाडी शिक्षण विभागाकडे नव्याने रुजू  झालेल्या कनिष्ठ लिपिक राजू मुजावर यांचा स्वागत व सत्कार करणेत आला. याप्रसंगी मुजावर यांनी विभागाकडील अपूऱ्या स्टाफमुळे रखडलेली प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करणेचे आश्वासन दिले. सर्व्हिस बुक अद्यावत करणे  कॅम्प, जुलै वेतन निश्चिती व अन्य कामे वेळेत पूर्ण होणेबाबत आणि शिक्षकांचे कोणतेही काम प्रलंबित  राहणार नाही असे आश्वासन दिले.संघटनेच्या वतीने आपल्या विभागाला नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष असिफ मुजावर यांनी केले.
याप्रसंगी माजी विस्ताराधिकारी रंगनाथ धायगुडे, विस्ताराधिकारी अशोक म्हेत्रे, डायट सहअधिव्याख्याता प्रकाश भुते, जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे, तालुका नेते बाळासाहेब ढेमरे, कोषाध्यक्ष शरद चव्हाण-पाटील, तानाजी गळवे, समाधान ऐवळे, संतोष ऐवळे, प्रविण बदडे व इतर बीआरसी स्टाफ उपस्थित होता. 

No comments:

Post a Comment

Advertise