वारणा धरणात पाणीसाठा लागला वाढू ; आज अखेर धरणात इतका पाणीसाठा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

वारणा धरणात पाणीसाठा लागला वाढू ; आज अखेर धरणात इतका पाणीसाठा


वारणा धरणात पाणीसाठा लागला वाढू ; आज अखेर धरणात इतका पाणीसाठा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे.तर शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 49.17 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 6.52 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50  टी.एम.सी, कन्हेर धरणात 4.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 6.46 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 2.70 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 16.33 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 5.38 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 87.99 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, दुधगंगा 900 राधानगरी 800, कासारी 250, अलमट्टी 46130. विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 5.5 (45), आयर्विन  पूल सांगली 7.9 (40) व अंकली पूल हरिपूर 9.2 (45.11)

No comments:

Post a Comment

Advertise