मास्कचा वापर करा : अन्यथा दंडात्मक कारवाई करणार : सरपंच सौ. पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

मास्कचा वापर करा : अन्यथा दंडात्मक कारवाई करणार : सरपंच सौ. पाटील


मास्कचा वापर करा : अन्यथा दंडात्मक कारवाई करणार : सरपंच सौ. पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील नागरिकांनी कोविड-19 संदर्भात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक करण्याचा इशारा सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी दिला आहे.
याबाबत आता दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढु लागल्यामुळे विभागीय आयुक्त दिपक म्हेसेकर पुणे यांनी, जे नागरिक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दि. 5 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनावर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ नये नागरिकांनी सतर्क राहून शासनाच्या नियमांचे पालन करावे म्हणजे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टस्निगचा पाळावे. जर मास्कचा वापर नाही केला तर ग्रामपंचायतच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सौ. वृषाली पाटील प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment

Advertise