Type Here to Get Search Results !

नेलकरंजीतील दोघेजण तर तडवळे येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह


नेलकरंजीतील दोघेजण तर तडवळे येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नेलकरंजी येथे पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कामध्ये आलेल्यांची यादी वाढतच चाली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये एका महिलेचा व एका मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 
तर तडवळे येथील एका अंदाजे ३७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. नेलकरंजी येथे संपर्कातील आलेल्या लोकांची यादी मोठी आहे. त्यामुळे आणखी किती जण कोरोना पॉझिटीव्ह येणार? असे नागरीकामधून बोलले जावू लागले आहे. या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व सोशल डिस्टस्निंगचा प्रभावी वापर करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies