राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 14, 2020

राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्या ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार आणि डहाणू, पालघर यांची नियुक्ती अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्त पदावर करण्यात आली आहे.इंदू राणी जाकर ज्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर करण्यात आली आहे.कुमार आशीर्वाद जे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक येथे कार्यरत आहेत यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर करण्यात आली.


श्रीकृष्णनाथ पांचाळ जे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा येथे आहेत. यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर करण्यात आली.


अभिनव गोयल जे प्रकल्प अधिकारी, किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी नांदेड़ येथे आहेत. त्यांची लातूर जिल्हा परिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise