देशातील प्रसिद्ध तिरुपती शहर 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

देशातील प्रसिद्ध तिरुपती शहर 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन


देशातील प्रसिद्ध तिरुपती शहर 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन
तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत अशी ओळख असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरुपती देवस्थान शहरात 5 ऑगस्टपर्यंत पूर्णत: लॉकडाउन घोषित करण्यात आला असून हा निर्णय शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पण, यादरम्यान तिरुपती बालाजीसह इतर सर्व मंदिर सुरू राहणार आहेत. शहरातील लॉकडाउनमुळे तिरुपती ट्रस्टने आपल्या ऑफलाइन सर्वदर्शन तिकीट व्यवस्था सध्या बंद केली आहे. आता मंदिरात दर्शनासाठी फक्त ऑनलाइन टाइम स्लॉट उपलब्ध असेल.
संपूर्ण तिरुपती शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तिरुपतीमधील सर्व 56 वार्डात 20 ते 30 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाने शहरांच्या सीमा बाहेरील वाहनांसाठी बंद केल्या असून, 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असेल. यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. यादरम्यान मंदिराच्या वाहनांना ये-जा करण्याची परवानगी असेल.

No comments:

Post a Comment

Advertise