Type Here to Get Search Results !

थकीत पगारामुळे एसटी स्वच्छता कंत्राटी कामगारांची उपासमारीची वेळ : ऑल इंडिया पँथर सेना


थकीत पगारामुळे एसटी स्वच्छता कंत्राटी कामगारांची उपासमारीची वेळ: ऑल इंडिया पँथर सेना
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : एसटी महामंडळाने राज्यातील बस स्थानके, कार्यालये आणि बसगाड्यांमधील अस्वच्छतेबद्दल ब्रिस्क या कंपनीला कंत्राट दिला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पांतर्गत एसटी कार्यालये, निवासस्थाने, स्थानके आणि बसगाड्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प २०१७ मध्ये महामंडळाने हाती घेतला होता. चालक-वाहक विश्रांतीगृहे, स्थानकांतील स्वच्छतागृहांची स्वच्छता आदीसाठी ब्रिस्क इंडिया कंपनीला सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे कंत्राट सरकारने दिले. मुंबई, नाशिक, अमरावती या विभागांत ब्रिस्क कंपनीने क्रिस्टल कंपनीला उपकंत्राट दिले आहे.



सांगली जिल्ह्य़ात प्रत्येकी बसस्थानकात सुपरवाइजर, 8 ते 10 कामगार असे जवळपास 170 कामगार, सुपरवायझर, फिल्ड ऑफिसर हे कार्यरत आहेत. या एसटी  कंत्राटी स्वच्छता कामगारांचा पगार डिसेंबर 2019 पासून झालेला नाही. लॉकडाऊन मुळे उपाशी मरण्याची वेळ आली आहे. सरकारच्या व ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या गैर कारभाराचा फटका कामागारांना बसत आहे, यात कामगारांचे मरण निश्चित आहे. ब्रिस्क कंपनीच्या कामाचा दर्जा निकृष्ट  आहे. ब्रिस्क इंडिया कंपनीला फायदा करून देण्यासाठी राज्यस्तरावर कंत्राट काढण्यात आले आहे. एसटी कामगारांच्या पगारासाठी महामंडळाकडे निधी नाही. डिझेल, ऑईलसाठी पैसे नाहीत. अशी माहिती अमोल वेटम यांनी दिली. 



असे असताना या कंत्राटदार कंपनीचा निकृष्ट दर्जाचे कामाबाबत ठोठावलेला कोटीचा दंड शासन माफ करते. याचा ऑल इंडिया पँथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट फोरम यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. स्वच्छता कामगारांचे थकीत पगार सरकारने 31 जुलै च्या आत करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट फोरमचे प्रमुख अमोल वेटम, मानतेश कांबळे, स्वप्निल खांडेकर यांनी दिले. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना सादर केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies