आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे तीन नवे रुग्ण
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. रूग्णामध्ये २ महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
यामध्ये बाळेवाडी येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील एक महिला व एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाग्रस्त रूग्णामध्ये ४० वर्षीय महिला व २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पात्रेवाडी येथे ५५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली असून ती ही पहिल्या पॉझिटिव्ह च्या संपर्कातील आहे. आज आलेल्या अहवालामध्ये ८० जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.