Type Here to Get Search Results !

कोकणातील या शिवसेना आमदाराला कोरोनाची लागण


कोकणातील या शिवसेना आमदाराला कोरोनाची लागण
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले असतानाच स्थानिक आमदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होत असतानाच सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. विशेषत: कुडाळ आणि मालवण या त्यांच्या मतदारसंघाच्या नेहमी दौऱ्यावर होते.
वैभव नाईक हे तेच जाएंट किलर शिवसेना आमदार आहेत, ज्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मोठ्या मतधिक्यांनी पराभव केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies