बोंबेवाडीच्या गुरुकुल विद्यालयाचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

बोंबेवाडीच्या गुरुकुल विद्यालयाचा १०० टक्के निकालाची परंपरा कायमबोंबेवाडीच्या गुरुकुल विद्यालयाचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम
माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : लोणारवाडी बोंबेवाडी गुरुकुल विद्यालयाचा इयत्ता दहावी सेमी माध्यमाचा १००% निकालाची सलग  पाच वर्षे उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे. 

सातत्य,जिद्द, चिकाटी, कौशल्य या बळावर ग्रामीण भागातील यशाची हमी असणारे ग्रामीण भागातून हिरे घडवणारे गुणवत्तापुर्ण शिक्षण देणारे विद्यालय म्हणून श्रीराम आदर्श माध्यमिक विद्यालय बोंबेवाडी या विद्यालयाचा लौकिक आहे.


विद्यालयातील परिक्षेला बसलेल्या एकुण ३५ विद्यार्थ्यापैंकी ९० टक्के च्या वर ४ विद्यार्थी, ८० टक्के च्या वर १५ विद्यार्थी, टक्के च्या वर २७ विद्यार्थी तर सर्वांत कमी ६७.४० टक्के असा आलेख आहे.


विद्यालयात प्रथम क्रमांक विश्वजीत ज्ञानेश्वर सुर्यवंशी ९३.४० टक्के, द्वितीय क्रमांक कु.माहेश्वरी संतोष ऐवळे ९१.२० टक्के, तृतीय कु.गिता चंद्रकांत करांडे ९० टक्के, चतुर्थ क्रमांक कु.साक्षी गोरख विभुते ९० टक्के, पाचवा क्रमांक कु.स्वाती मोहन मोटे ८८.६० टक्के, तर सहावा क्रमांक कु.शेजाळ तनुजा दत्तात्रय शेजाळ ८७.२० टक्के यांनी पटकाविला.


सर्वसामान्य शेतकरी कुंटुबातील विद्यार्थी सेमी माध्यमातुन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाची परिसरात मोठी चर्चा आहे. या विद्यालयाच्या यशाचे सूत्र म्हणजे विद्यार्थी, शिक्षक,पालक यांचा समन्वय तसेच सातत्य, कष्ट व नियोजन यामुळेच हे शक्य झाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन शहाजी (बापु) जाधव, दिनकर करांडे, हणमंत करांडे, नामदेव घेरडे, नागेश चांडोले, दैवत काळेल, नामदेव खरात, दादा मोटे, अरविंद पवार, बाळासाहेब पाटील, संतोष ऐवळे, संभाजी पवार, दत्तात्रय शेजाळ, संदिप जेडगे, मिलींद नरळे, गणेश गोडसे, प्रविण करांडे  यांनी केले.
No comments:

Post a Comment

Advertise