विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली’ : या प्रसिद्ध लेखकाचा आरोप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली’ : या प्रसिद्ध लेखकाचा आरोप


विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली’ : या प्रसिद्ध लेखकाचा आरोप 
मुंबई : प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी फिल्ममेकर आणि निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांच्यामुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती, असा गंभीर आरोप भगत यांनी केला आहे. चेतन भगत यांच्या ’फाईव्ह प्वाईंट सम वन’ पुस्तकावर आधारीत 2009 मध्ये बनलेल्या ’3 इडियटस’ चित्रपटाची निर्मिती विधु विनोद चोप्रा यांनी केली होती.चेतन भगत यांनी टवीट करत म्हटलं आहे की, ’सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा चित्रपटाबद्दल समीक्षकांनी समजतूदारपणे लिहावं. त्यांनी ओव्हरस्मार्ट होऊन लिखाण करू नये. त्यांनी निष्पक्ष आणि समजूतदार व्हावं, काही घाणेरड्या चाली खेळू नयेत, आपण आधीच अनेकांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे’ असं भगत यांनी म्हटलं.
चेतन भगत यांच्या टिवटला विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांनी उत्तर दिलं आहे. ’समजूतदारपणाचा स्तर यापेक्षा खाली जाणार नाही, असा विचार काही जण करतात. मात्र तरीही दुर्दैर्वानं तो स्तर घसरतो,’ असं अनुपमा यांनी म्हटलं.त्यांच्या या टिवटला प्रत्युत्तर देताना भगत यांनी अनुपमा यांचे पती विधू विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ’विधू विनोद चोप्रा यांनी कोणतीही शरम न बाळगता कथेशी संबंधित सर्व पुरस्कार स्वत: घेतले. त्यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं,’ असा आरोप भगत यांनी केला आहे.पुढे चेतन भगत यांनी लिहिलं आहे की,‘आणि त्यावेळी आपण केवळ पाहात होतात, त्यावेळी आपले हे उपदेश कुठं होते.‘ या टिवटवर यूझर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise