Type Here to Get Search Results !

सांगलीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव


सांगलीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : सांगलीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. 
श्रीमती म्हैसकर यांनी शासनाच्या विविध विभागात काम करताना यापूर्वी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतिंचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.
गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies