Type Here to Get Search Results !

कुपवाडमधील दत्तात्रय पाटोळे याच्या खून प्रकरणाचा छडा ; जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात

कुपवाडमधील दत्तात्रय पाटोळे याच्या खून प्रकरणाचा छडा
जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कुपवाड येथील राष्ट्रवादीचा पदाधिकारी दत्तात्रय पाटोळे यांच्या खूनाचा तपास २४ तासाच्या आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आला. याप्रकरणी निलेश विठोबा गडदे (वय-21,रा.वाघमोडेनगर कुपवाड), सचिन अज्ञान चव्हाण (वय-22,रा.आरपी पाटील, शाळेजवळकुपवाड), वैभव विष्णु शेजाळ (वय-21 रा.विठायाचीवाडी ता.कवठेमहकाळ सध्या रा, वाघमोडेनगर कुपवाड), मत्युजंय नारायण पाटोळे (वय-27 रा.आंबा चौक यशवंतनगर ता.मिरज), किरण शंकर लोखंडे (वय-19 रा.वाघमोडेनगर कुपवाड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहे. जिरग्याळ ता.जत येथील वनविभागाच्या हद्दीतून त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले.
कुपवाड येथील राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेला दत्तात्रय महादेव पाटोळे रा.वाघमोडेनगर कुपवाड यांचा दिनांक 10 रोजी, सकाळी अज्ञात इसमांनी इसमानी संगनमत करुन गाडी आडवी मारून, पाठलाग करून त्याचे डोकीत, शरीरावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी भेट देवून या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या गुन्यातील आरोपीच्या शोध कामी दोन वेगवेगळी पथके तयार केली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील पथकाने गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून, सदर मयताचे वाघमोडे नगर, मधील मित्र, नातेवाईक, पाहुणे यांचे कडे खुनाचे कारणा विषयी माहीती घेत असताना, पथकातील पो.ना.सागर लवटे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मयत दत्तात्रय पाटोळे यांचा काही दिवसापुर्वी किरकोळ कारणावरुन निलेश गडदे यांचेत वाद झाला होता. याचा राग मनात धरुन निलेश गडदे व त्याचे मित्रांनी मिळून हा खुन केला असल्याचे समजले. हे संशयित आरोपी हे जिरग्याळ ता. जत येथील वनविभागाच्या  कुरणात असल्याचे माहीती मिळाली. याठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने छापा मारुन त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे दत्तात्रय पाटोळे यांच्या खुनाच्या गुन्हयाच्या अनुषंगाने निलेश गडदे याचे कडे चौकशी केली असता, त्याने जून्या भांडणाचा राग मनात धरुन मित्रांसोबत त्याचा खून केला असल्याची कबूली पोलिस पथकाला दिली आहे. त्यांना अटक करून पुढील तपासासाठी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/प्रविण शिंदे, प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, अंतम खाडे, शरद माळी सपोफौसागर पाटील, जगन्नाथ पवार, बिरोबा नरळे, सागर लवटे, निलेश कदम, जितेद्र जाधव, मेघराज रुपनर, अरुण औताडे, अमित परिट, सुधीर गोरे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, शशिकांत जाधव, सुनिल लोखंडे, मुद्दसर पाथरवट, आमसिध्द खोत, राजू शिरोळकर, राजू मुळे, संजय पाटील, सचिन कणप, वैभव पाटील, विकास भोसले, संजय कांबळे, सुहेल, अजय बेंद्रे, सचिन सूर्यवंशी, अरुण सोकटे, स्वप्नील नायकोडे,सुवर्णा देसाई, प्रशांत माळी, आर्यन देशिगकर, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies