आटपाडीतील प्रसिद्ध नागपंचमीची यात्रा रद्द झालेने परिसर सुनासुना... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

आटपाडीतील प्रसिद्ध नागपंचमीची यात्रा रद्द झालेने परिसर सुनासुना...

आंबामाता मंदिर आटपाडी

आटपाडीतील प्रसिद्ध नागपंचमीची यात्रा रद्द झालेने परिसर सुनासुना...
माणदेश एक्स्प्रेस न्युजआटपाडी/बिपीन देशपांडे : गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरी होत असलेली नागपंचमी कोरोनामुळे साजरी होऊ न शकल्याने आंबामाता परिसर सुनेसुने वाटत असून इतिहासात प्रथमच खंड पडला आहे.लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने दोन दिवस आधी मंदिर परिसर स्वच्छता केली जात असे. ये-जा करणाऱ्या रस्त्यावर दिवाबत्तीची सोय असल्याने सर्व रस्ते उजळून निघायचे. आखून दिलेल्या जागेवर छोटे-मोठे व्यापारी आपला व्यवसाय करत. आंबा माता मंदिरावर केलेली आकर्षक दिव्यांची रोषणाई मंदिर परिसर पूर्ण गजबजलेला असायचा. खेळणी, पूजासाहित्य विविध प्रकारचे स्टॉल व सर्व रस्ते गर्दीने फुलले असायचे.
श्रावण महिन्यातील पहिला सण असल्याने सासरी आलेल्या मुलीला माहेरची ओढ असल्याने आधी आठ दिवस मुक्काम असायचा. यात्रेतील विविध प्रकारचे स्टॉल, पाळणे, विविध प्रकारचे मनोरंजनाची साधने ह्याचा आनंद लुटत कित्येक वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणीबरोबर गुज गप्पागोष्टी करत आनंदी क्षण डोळ्यात साठवून ठेवत असत. शहरातील मुख्य पेठ, कलेश्वर मंदिर परिसर, बायपास रोड व मंदिर परिसर गर्दीने ओसंडून वाहत असे. पण आता कोरोनामुळे आटपाडी शहरात वाढलेले कोरोना रूग्णामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे भयानक परिस्थिती असल्याने संपूर्ण शहरात सन्नाटा पसरला आहे. दर्शनासाठी अंबामाता मंदिर बंद असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिराच्या ठिकाणी नाग प्रतिमेची पूजा करण्यात आली. मंदिर बंद असल्याने नागपंचमी मुळे होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी भरणारी नागपंचमी यात्रा यावेळी लॉकडाऊनमुळे न झाल्याने अंबामाता व परिसर सुनासुना राहिला.

No comments:

Post a Comment

Advertise