कोरोनामुळे बाळ-गोपाळांची दिंडी निघालीच नाही - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

कोरोनामुळे बाळ-गोपाळांची दिंडी निघालीच नाही


कोरोनामुळे बाळ-गोपाळांची दिंडी निघालीच नाही
कोरोनामुळे बाळ-गोपाळांची दिंडी निघालीच नाही 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस संसर्ग वाढत आहे. शासनाने लॉकडाऊन केल्याने सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले. शाळा, कॉलेज, मॉल, बाजारपेठ, आठवडा बाजार, बस सेवा, विविध व्यवसाय व मनोरंजन कार्यक्रम या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर निर्बंध लादले गेले.
 परंतु काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शासनाने दिलेल्या नियमानुसार सकाळी नऊ ते पाच या वेळेत सोशल डिस्टन्स पाळण्यासह परवानगी मिळाली. शाळा हायस्कूल चालू होणार की नाही यावर अधिक चर्चा होत असताना यंदा मात्र कोरोना ने शेकडो  वर्षाची परंपरा असलेली आषाढी एकादशी निमित्त निघणारी बालगोपाळांची दिंडी मात्र दिसली नाही. आटपाडी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी यांच्यावतीने ही दिंडी काढण्यात येते. शिक्षक वर्ग उत्कृष्टपणे नियोजन करतात. निघणारी पालखी सोहळा हार फुलांनी सजवून विविध आकर्षक वेशभूषा सह टाळ-मृदंगाच्या गजरात मुखी विठुरायाचा गजर करत शाळा व अंगणवाडी विद्यार्थी, विद्यार्थिनी या उत्सवा उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. हा दिंडी सोहळा बस स्थानक ते मुख्य पेठ विठ्ठल मंदिर व बाजार पेठ येथे आल्यानंतर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी व आपल्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी पालक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र यावर्षी कोरोना ने त्यांच्या आनंदावर विरजण पडले असून शाळा बंद असलेले यावर्षीचे शाळेतील बाल गोपळजी दिंडी सोहळा परंपरा खंडित झाल्याने आज आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा निघू शकला नाही.


No comments:

Post a Comment

Advertise