Type Here to Get Search Results !

जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करा : सरपंच राधिका बागल ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय


जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करा : सरपंच राधिका बागल 
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रात लॉकडाऊन तर ग्रामीण भागात जनता कर्फ्यूचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घोषित केल्यानंतर त्या अनुशंगाने लेंगरे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत लेंगरे गावात ३० जुलै पर्यत जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास प्रतिसाद देत लेंगरे ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती, व्यापारी संघटना ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन करण्यासाठी जीवनावश्यक सेवा (मेडिकल) वगळता पूर्ण लेंगरे गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गावामध्ये सोशल डिस्टसिंग व मास्क वापरणे अनिवार्य केले असून जर उल्लंघन झाल्यास पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
लेंगरे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच गावातील सर्व व्यावसायिक संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने स्वयंस्फूर्तीने तीन दिवस संपूर्ण गाव बंद व ३० जुलै पर्यंत गावामध्ये जनता कर्फ्यू काटेकोरपणे पालन करण्याचे निश्चित केले असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता गावामध्ये कडकडीत पणे बंद पाळण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. गावातील सर्व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू मध्ये उस्फुर्त प्रतिसाद द्यावा. गावातील नागरिकांनी कृपया घराबाहेर पडू नये अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांनी आपली नोंदणी त्वरित करावी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती प्रशासनास सहकार्य करावे. कोणीही घाबरून न जाता जागृत राहून जनता कर्फ्यू पाळावा व घरीच रहा. सुरक्षित रहा असे आवाहन सरपंच राधिका बागल यांनी केले.
यावेळी उपसरपंच राणी कांडेसर, मा.सरपंच प्रशांत सावंत, असिफ देसाई, मा.चेअरमन सुनिल पाटील, जेष्ठ नेते श्रीरंग शिंदे, पोलीस पाटील पुष्पा बोबडे, ग्रामसेवक वसंत माळी, हणमंत पाटील, असलम शेख,  नानासाहेब मंडलिक, नितीन चंदनशिवे यांचेसह आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies